Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मालवण चिवला बीच वरील ई-टॉयलेट सेवा बंद !

मालवण चिवला बीच वरील ई-टॉयलेट सेवा बंद !

पर्यटक - पर्यटन,व्यावसायिकां मध्ये नाराजी

"ई-टॉयलेट "ची त्वरित दुरुस्ती करावी नगरपालिका प्रशासना कडे मागणी

जुबेर खान । मालवण : कोकण किनारपट्टीवरील सौंदर्य आणि स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असलेल्या मालवण शहराला पर्यटनाचा केंद्रबिंदू मानले जाते. या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक विविध पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी येत असतात. यातीलच एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे चिवला बीच, जो आपल्या निळ्याशार पाण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी ओळखला जातो. मात्र, सध्या याच बीचवरील पर्यटकांच्या मूलभूत सुविधेमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मालवण नगरपरिषदेमार्फत पर्यटकांच्या सोयीसाठी २०२४ मध्ये लावण्यात आलेले ई-टॉयलेट सध्या बंद अवस्थेत असल्याने स्थानिकांसह पर्यटक, पर्यटन व्यावसायिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

चिवला बीचवर येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगरपरिषदेने हे ई-टॉयलेट (E-Toilet) बसवले होते. परंतु, सध्या हे ई-टॉयलेट पूर्णपणे बंद आहे, ज्यामुळे बीचवर येणाऱ्या पर्यटकांना विशेषतः महिला आणि लहान मुलांना नैसर्गिक विधीसाठी मोठी अडचण होत आहे. स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असलेल्या बीचवरच जर अशी दुरवस्था असेल, तर पर्यटक इतर ठिकाणी वळू शकतात आणि याचा थेट परिणाम मालवणच्या पर्यटन व्यवसायावर होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या गंभीर समस्येबद्दल पर्यटन व्यावसायिक फ्रान्सिस फर्नांडिस आणि विशाल गोवेकर यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मालवणला येणारा पर्यटक हा मूलभूत सुविधांची अपेक्षा ठेवतो. चिवला बीचसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जर शौचालयासारखी प्राथमिक गरज पूर्ण होत नसेल, तर पर्यटकांची संख्या निश्चितच कमी होईल. "सध्या पर्यटन हंगाम सुरू होत आहे. हाच काळ आमच्या व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, याच वेळी जर नगरपरिषदेने पर्यटकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष केले, तर याची सर्वस्वी जबाबदारी मालवण नगर परिषद प्रशासनावर असेल," असे मत फ्रान्सिस फर्नांडिस यांनी व्यक्त केले. विशाल गोवेकर यांनीही या समस्येकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. "नगरपरिषदेने अत्याधुनिक सुविधा म्हणून ई-टॉयलेट बसवले, पण ते सुरू न ठेवणे म्हणजे पर्यटकांना सुविधा न देण्यासारखेच आहे. यामुळे मालवणची प्रतिमा खराब होत आहे," अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
सध्या सुरू होत असलेला पर्यटन हंगाम लक्षात घेता, या समस्येचे गांभीर्य अधिक आहे. अनेक पर्यटक सुट्टीसाठी मालवणला येण्याची योजना आखत आहेत. अशा परिस्थितीत जर मूलभूत सुविधा उपलब्ध नसतील, तर पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे, पर्यटन व्यावसायिक फ्रान्सिस फर्नांडिस आणि विशाल गोवेकर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी मालवण नगरपालिका प्रशासनाकडे तातडीने याकडे लक्ष देऊन, चिवला बीचवरील बंद असलेले ई-टॉयलेट त्वरित दुरुस्त करून सुरू करण्याची मागणी केली आहे. पर्यटकांना चांगली सुविधा मिळाल्यास मालवणचे पर्यटन अधिक वाढेल, यात शंका नाही. त्यामुळे नगरपरिषदेने या मागणीची दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ruchira top