मालवण प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या भक्तिमय पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अभंग भक्तिगीत गायन स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांच्या गायन कौशल्याचा विकास करणे आणि त्यांना व्यासपीठ प्रदान करणे ,तसेच आषाढी एकादशी वारीचा महिमा विद्यार्थ्यांना पटवून देणे हा होता.
स्पर्धेची सुरूवात सकाळी १० वाजता मा. मुख्याध्यापक वळंजू सर तसेच मा. पर्यवेक्षक श्री.गोसावी सर यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मूर्तीला तुळशीहार अर्पण करून झाली. मा. मुख्याध्यापक श्री .वळंजू सर यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्रातील संत परंपरेचा महिमा सांगून कार्यक्रमाची भक्तीमय केली..स्पर्धेमध्ये इयत्ता ११वी व १२वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत एकूण १५ स्पर्धक सहभागी झाले होते.प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या शैलीत भक्तिगीते सादर केली.त्याचे परीक्षक प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.अक्षता तांबे मॅडम तसेच सौ. मानसी धामापूरकर मॅडम यांनी केले.प्रथम क्रमांक कु.स्वरूप वळंजू, द्वितीय क्रमांक कु. सोहम चिंदरकर आणि तृतीय क्रमांक कु. सानिया आजगावकर यांनी पटकावला. विजेत्यांना मुख्याध्यापकांच्या तसेच पर्यवेक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभागाचे श्री.साटम सर, सौ.तिनईकर मॅडम सौ. अस्मिता रावराणे मॅडम,श्री.गवळी सर,श्री.तोंडवळकर सर,श्री .आजगावकर सर तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री.प्रभुदास आजगावकर सर यांनी केले.आय. टी.विषयाच्या शिक्षिका उमा सामंत मॅडम यांनी चित्रफितीतून आषाढी वारीचे पूर्ण दर्शनच घडवून आणले.भविष्यात अशा स्पर्धा अधिकाधिक आयोजित करून विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांचा विकास करण्याची संधी देण्याचा प्रशालेचा मानस आहे.

