मालवण । प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील रेवतळे येथे रुपेश करलकर आणि उमेश चव्हाण मित्रमंडळ यांच्या वतीने एक गाव एक संघ पावसाळी रबर बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ८ ऑगस्ट रोजी या स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. हि स्पर्धा दि. ८ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान खेळवली जाणार असून विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक २०,००० रोख व आकर्षक चषक तर द्वितीय पारितोषिक १०,००० रुपये रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. त्यासोबत उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर अशी वैयक्तिक बक्षीस देखील देण्यात येणार आहेत.
महापुरुष रेवतळे या मैदानावर या स्पर्धा होणार असून क्रिकेटप्रेमींना या स्पर्धा 'स्काय न्यूज टुडे' या युट्यब चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहेत. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघाला प्रवेश शुल्क २००० असून संघांनी ६ ऑगस्ट पर्यंत आपल्या संघाची नावे नोंदवायची आहेत. अधिक माहितीसाठी पायस अल्मेडा : 9307915141 यांच्याशी संपर्क साधावा.

