Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

जास्तीत जास्त युवक युवतीनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सहभागी व्हावे !

मालवण येथील कार्यक्रम उदघाटन प्रसंगी तहसीलदार वर्षा झालटे यांचे आवाहन

मालवण | प्रतिनिधी : महसूल पंधरवडा अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत उमेदवारांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या नोंदणी कॅम्पला मालवण तालुक्यातील उमेदवारांकडून उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. ज्या उमेदवारांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. त्या उमेदवारांनी आपल्या परिचयातील अन्य उमेदवारांना या उपक्रमाबाबत माहिती द्यावी व त्यांनाही या उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे. असे आवाहन तहसीलदार वर्षा झालटे यांनी नोंदणी कॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.

यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, कौशल्य विकासचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन संके, अमित खेडेकर, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य सुरेश पाटील, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, श्रध्दा चौगुले, प्रकाश शिरहट्टी, सुप्रिया महाडीक आदि उपस्थित होते.

तहसीलदार वर्षा झालटे म्हणाल्या, सिधुदुर्ग जिल्हयातील शासकीय निमशासकीय कार्यालये, महामंडळ अशा प्रत्येक कार्यालयात किमान ०१ उमेदवार व कमाल मंजूर पदांच्या ५ टक्के उमेदवार या योजनेंतर्गत भरले जाणार आहेत. जिल्ह्यात सहाशे पेक्षा जास्त रिक्तपदे पोर्टलवर अधिसूचित केली आहेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये सहा मिहने काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी त्यांना विद्यावेतन दिले जाणार आहे. त्यामुळे मालवण तालुक्यातील बारावी, आयटीआय व डिप्लोमा उत्तीर्ण, पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांनी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करुन घ्यायची आहे. नोंदणी केल्यानंतर संबंधित विभागाकडून त्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांनी केले.

ruchira top