Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पात्र महिलेच्या नावाने ३१ जुलै पूर्वीची गॅस जोडणी आवश्यक

गॅस कनेक्शन ई-केवायसी करुन घ्यावे

बँक आकाऊंट आधार संलग्न असावे

सिंधुदुर्ग : राज्य शासनाने 'मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना' ही महत्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती पद्मश्री बैनाडे, संबंधित विभागाचे अधिकारी, बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑईल कार्पोरेशनचे प्रतिनिधी तसेच गॅस एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे पात्र लाभार्थी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटूंब या योजनेस पात्र असणार आहे, एका कुटूंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी योजनेस पात्र ठरणार आहे. तरी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

श्रीमती बैनाडे म्हणाल्या शासन निर्णयाप्रमाणे १ जुलै २०२४ रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात यावा, १ महिन्यात केवळ १ गॅस सिलेंडर रीफिल करता येणार, हा लाभ केवळ १४.०२ किलो ग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुज्ञेय असेल, १ जुलै २०२४ रेाजीनंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत, लाभार्थ्यांनी गॅस कनेक्शनचे ई-केवायसी करुन घ्यावे तसेच बँक आकाऊंट देखील आधार संलग्न करुन घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

ruchira top