उपाध्यक्षपदी श्रीयांश कानविंदे, खजिनदार कपिल गुरव, सचिवपदी संतोष मिराशी यांची निवड
आचरा महसूली गावातून कपिल गुरव विजयी
आचरा :आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे न्यासच्या अध्यक्षपदी प्रदिप परब मिराशी, उपाध्यक्षपदी श्रीयांश कानविंदे, खजिनदारपदी कपिल गुरव, सचिवपदी संतोष मिराशी यांची निवड यांची निवड झाली. गुरुवारी झालेल्या न्यासाच्या बैठकीत सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गेला दीड महिना लक्ष लागून राहिलेली न्यासाची निवडणूक ही 31 जुलै रोजी पार पडली. यात मिराशी घराणे प्रतिनिधी म्हणून प्रदीप परब मिराशी, कानविंदे घराणे प्रतिनिधी मधून श्रीयांश कानविंदे यांचे उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची सदस्यपदी निवड झाली. तर चार महसूल गावापैकी आचरा, वरचीवाडी, गाऊडवाडी, डोंगरेवाडी या चार महसूली गावासाठी निवडणूक होणार होती. यातील वरचीवाडी येथून संतोष मिराशी, गाऊडवाडी येथून शिल्पण गावकर आणि डोंगरेवाडी येथून मंगेश मेस्त्री यांचे एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची न्यास सदस्यपदी बिनविरोध निवड झाली.
आचरा महसूल गावातून कपिल गुरव विजयी
मात्र आचरा या महसूल गावातून कपिल गुरव व अर्जुन बापर्डेकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल असल्याने या भागासाठी निवडून झाली. या महसूली गावातील 64 मतदारांपैकी 53 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात कपिल गुरव गुरव यांना 37 मते तर अर्जुन बापर्डेकर यांना 16 मते मिळाली. यात कपिल गुरव हे आचरा महसूल गावातून विजयी झाले. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणूक प्रक्रियेला निवडणूक अधिकारी म्हणून प्राचार्य गुरूदास दळवी यांनी काम पहिले

