Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट येथे जागतिक युवा कौशल्य दिन संपन्न

भाऊ भोगले | बागायत : श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट येथे जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेच्या वतीने MSAT विभागाच्या विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा तसेच प्रदर्शन मांडण्यात आले होते. यामध्ये रानभाज्यांच्या स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्तकलेच्या वस्तू तसेच इनोव्हेटिव्ह वस्तू मांडण्यात आल्या होत्या.

यावेळी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी गुलाब पुष्प आणि शुभेच्छा दिल्यानंतर प्रभातफेरी मार्गस्थ झाली. यावेळी "कुशल व्हा, पात्र व्हा"अशा अनेक घोषणा देत संपूर्ण गाव प्रभातफेरीने विद्यार्थ्यांनी दुमदुमून सोडला.

प्रशालेची IBT/MSAT ची माजी विद्यार्थिनी आणि सध्या रिगल कॉलेज हॉटेल मॅनेजमेंट च्या प्रोफेसर सौ अक्षता पाताडे/कदम आणि फार्मासिस्ट सुरभी हडकर या प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने केली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी.एच. कुबल यांनी केले, तसेच प्रास्ताविक WET निर्देशक जगन्नाथ आंगणे यांनी केले सौ. पाताडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण केले.

यावेळी त्यांनी MSAT विभागामुळे आपणाला फार मोठा फायदा झाल्याचे स्पष्ट केले व याच्यामुळे आपला पाया भक्कम होतो. याची उदाहरणे दिली, तसेच सध्या व्यवसाय शिक्षणाची फार मोठी गरज असल्याचे बोलून दाखवले. त्यासोबतच मालवण तालुक्यामध्ये आपल्या संस्थेच्या दोन शाळा असल्याने आपण सर्व भाग्यवान असल्याचेही त्या म्हणाल्या. त्यानंतर सुरभी हडकर यांनी फार्मासिस्ट होण्यासाठी काय करावे याची माहिती दिली व फार्मासिस्ट झाल्यानंतर कोणकोणत्या संधी असतात त्याचे विश्लेषण केले व डिप्लोमा डिग्री याच्यामुळे समाजामध्ये आपणाला फार मोठे स्थान असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषण प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी.एच .कुबल यांनी केले. त्यावेळी त्यांनी माजी विद्यार्थ्यांमुळे शाळेला फार मोठा फायदा होत असल्याचे स्पष्ट केले तसेच या प्रशालेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकिक करत असल्यामुळे आपणाला सार्थ अभिमान असल्याचे ते म्हणाले. तसेच सध्या विद्यार्थी दशेत असणाऱ्या सर्वांना असेच मोठे व्हा उद्योजक बना असे आवाहन केले.

मान्यवरांच्या हस्ते रानभाज्यांचे तसेच इतर साहित्यांचे परीक्षण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांचे क्रमांक जाहीर करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कौशल्यांचा वापर करून इनोव्हेटिव्ह वस्तू बनवून आणल्याचे पाहून मान्यवर तसेच पालक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व मार्गदर्शक शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

FPT निर्देशक कु. हर्षदा पाटकर, GNAT निर्देशक सौ कविता माडये /पाटकर यांनी सर्व व्यवस्थापन केले. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन E&E निर्देशक केशव भोगले यांनी केले. यावेळी त्यांनी सर्व प्रथम LAHI संस्थेचे आभार मानले त्यानंतर सर्व मान्यवरांचे आभार मानले.

ruchira top