Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सौ. सिता सुरेश घाडीगावकर

सौ. सिता सुरेश घाडीगावकर

भजन क्षेत्रातील जेष्ठ 'कलारत्न'

🖋️ स्काय न्युज टुडे | मंगेश नलावडे : प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना स्त्री शक्तीला आदरयुक्त प्रणाम..! देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने 'स्काय न्यूज टुडे' वेब टीमच्या माध्यमातून 'नवदुर्गा' या सदरातून स्त्री शक्तींच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….!

आज असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाही कि ज्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला नाहीत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, करत आहेत.

आपल्या कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्यामुळे आज भजन क्षेत्रात मुंबई सारख्या शहरात आपली भजन सेवा सादर करून भजन रसिकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या मालवण तालुक्यातील शिरवंडे रतांबेवाडी येथील सुप्रसिद्ध लोकप्रिय महिला भजनी बुवा सौ. सिता सुरेश घाडीगावकर या होय.भजन क्षेत्रात पहाडी आवाजाने त्या पसंतीस उतरत आहेत.


भजन क्षेत्रात त्यांना कुडाळ माणगाव येथील लोकप्रिय शिव भजनी बुवा श्री प्रमोद नारायण धुरी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. आपल्या गुरु विषयी सांगताना सौ. सीता घाडीगावकर म्हणाल्या विनामूल्य सर्व शिष्यांना ते भजन क्षेत्राच शिक्षण देत आहेत. असे गुरु आपल्याला लाभले हे माझे भाग्य आहे. त्याचा आशीर्वादामुळे आणि आई वडिलांची पुण्याईमुळे आज भजन क्षेत्रात नावलौकिक मिळाले आहे.

मूळ कुडाळ नेरूर येथे माहेर असलेल्या बुवा सौ. सिता सुरेश घाडीगावकर यांचा विवाह शिरवंडे रतांबेवाडी येथील श्री सुरेश लक्ष्मण घाडीगावकर यांच्या सोबत झाला. त्याचे पती यांना भजन, दशावतार या कलेची आवड होती. त्याची इच्छा होती की आपल्या पत्नीने भजन क्षेत्रात उतराव. म्हणून सौ. सिता घाडीगावकर या भजन क्षेत्रात आल्या. पतीच्या खंबीर पाठिंब्यामुळे त्यांनी भजन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. अस म्हटल जात प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका स्त्री हात असतो पण इथे एका यशस्वी स्त्री च्या मागे एका पुरुषाची भक्कम साथ आहे. श्री सुरेश लक्ष्मण घाडीगावकर गेली कितेक वर्ष स्वतः पुढाकार घेऊन आपल्या पत्नीला भजन क्षेत्रात साथ देत आहेत. मुंबई मालाड या शहरात नवदुर्गा प्रासादिक महिला भजन मंडळ (मालाड) त्या यशस्वी रित्या सांभाळत आहेत.दिली.

सौ. घाडीगावकर यांनी २००२ साली संगीत क्षेतात पहिले पाऊल टाकले. त्या नंतर त्यांनी अनेक भजन स्पर्धे मध्ये उतरून नंबर पटकावले. यात महाराष्ट कामगार कल्याण भजन स्पर्धा २०२० प्रथम क्रमांक, राज्यस्तरीय भजन स्पर्धा नाशिक द्वितीय क्रमांक २०२०, शिवसेना शाखा ३६/३७ आयोजित भजन स्पर्धा प्रथम क्रमांक २०१९, महाराष्ट कामगार कल्याण भजन स्पर्धा २०२३ प्रथम क्रमांक, महाराष्ट कामगार कल्याण भजन स्पर्धा द्वितीय क्रमांक २०२४, समरगीत स्पर्धा प्रथम क्रमांक २०२० त्याच प्रमाणे इतर भजन स्पर्धेत देखील उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट हार्मोनियम, उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाली आहेत. त्याचा प्रमाणे त्याचा कोरस मंडळीला सुद्धा उत्कृष्ट कोरस म्हणून पारितोषिक मिळाले आहेत आणि उत्कृष्ट झांज वादक म्हणून पारितोषिक मिळाली आहेत.

कुटुंबातील मुलांची ही मोठी साथ भजन क्षेत्रात मिळाली. मुलगा लक्ष्मण सुरेश घाडीगावकर हा उत्कृष्ट पखवाज वादक व ढोलकी वादक आहे. २०१८ मध्ये त्याने पाहिले भजन वाजवलं. तेव्हा पासून ते आता पर्यंत मला भजन क्षेत्रात पखवाज व ढोलकी साथ करत आहेत. त्याच बरोबर मुलीगी लीना सुरेश घाडीगावकर आता तीच लग्न झालं मात्र त्या आधीच्या काळात तिने खूप वर्षे मला कोरस म्हणून साथ केली आहे. घरातून पती, मुलगा आणि मुलगी या तिघांचाही खंबीर पाठिंबा मिळाला.

भजन क्षेत्रात महत्वाच सपोर्ट लागतो तो म्हणजे बुवा, पखवाज सोबत कोरस मंडळी. त्या शिवाय भजन मंडळ अपूर्णु आहे. आमच्या नवदुर्गा प्रासादिक महिला भजन मंडळातील कोरास मंडळी बद्दल बोलाव तेवढं कमीच आहे. एका फोन कॉल वर भजनासाठी तयार असणारी आमची कोरस मंडळी आहेत. महिन्यातील दर शनिवारी नियमित रियसल असते. कोणता दिवस न चुकवता रियसल येणे सर्व जन ऐक कुटुंब प्रमाणे मिळून मिसळून राहतात. माझ्या कोरस मंडळी बद्दल बोलाव तेवढंच कमीच आहे असे ही सौ. घाडीगावकर सांगतात.

भजन हे ईश्वर सेवेच साधन आहे. आणि भजना मध्ये नामस्मरण करून परमेश्वर प्राप्तीचा आनंद मिळतो. संगीत कला क्षेत्रात आज नवनवीन संधी आहेत. त्या युवा पिढीने खास करून महिला युवतीने या क्षेत्रात येऊन आपले नाव लौकिक वाढविले पाहिजे. भजन म्हणजे ईश्वर सेवे बरोबरच समाजात मान सन्मान मिळवून देणार संतांनी दिलेल व्यासपीठ आहे. त्याचा अंगीकार करून ईश्वर सेवेत रंगून गेल पाहिजे असे त्या सांगतात.

नवरात्रोत्सवाच्या या शुभप्रसंगी सौ. सिता सुरेश घाडीगावकर यांच्या भविष्यातील सर्व वाटचालीस अधिक यश मिळो, हीच देवी चरणी प्रार्थना! स्काय न्यूज टुडे परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा….!

▪️अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग


ruchira top