सरकार पक्षातर्फे ॲड. तुषार भणगे यांनी पाहिले काम
मालवण : इच्छापूर्वक दुखापत केल्याप्रकरणी मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एम. आर. देवकाते यांनी अन्मय आत्माराम गावकर, दर्शन सत्यवान गावकर दोन्ही रा. हडी गावकरवाडी, मालवण या दोन आरोपींना भा. द. वि कलम ३२३ सह ३४ अंतर्गत दोषी ठरविले आहे तसेच सदर आरोपींना एकत्रितरित्या रुपये १० हजार जखमी स्मिता सहदेव गावकर हिस नुकसान भरपाई म्हणून मे न्यायालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदर केसचे कामी सरकार पक्षातर्फे ॲड. तुषार भणगे यांनी काम पाहिले.

