भजन, डबलबारी क्षेत्रातील 'कलारत्न'
💐 नवदुर्गा : पुष्प आठवे 💐

कु. समृद्धी संतोष चव्हाण
🖋️ स्काय न्युज टुडे | मंगेश नलावडे : प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना स्त्री शक्तीला आदरयुक्त प्रणाम..! देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने 'स्काय न्यूज टुडे' वेब टीमच्या माध्यमातून 'नवदुर्गा' या सदरातून स्त्री शक्तींच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….!
आज असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाही कि ज्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला नाहीत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, करत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशी अनेक रत्ने आहेत. त्यापैकीच एक अवघ्या २४ वर्षाची पण कीर्ती महान अशी ख्याती असलेली देवगड तालुक्यातील वेळगिवे वाघिवरे गावची सुकन्या कलारत्न कु. समृद्धी संतोष चव्हाण या होय….! त्यांनी डबलबारी, भजन यांसह स्पर्धा आणि सामाजिक, सांस्कृतिक कार्यातून लौकिक प्राप्त करत आपली ओळख निर्माण केली आहे.

देवगड तालुक्याती वेळगिवे या ऐतिहासिक श्री देव रामेश्वराच्या पावन भूमीत जन्मलेल्या कु. समृद्धी चव्हाण यांना बालपणा पासूनच संगीत भजन कले चा वारसा मिळाला आहे. आपले आजोबा, काका, वडील यांचा भजनाचा वारसा त्या पुढे चालवत आहे. पिढ्यान पिढी चालत आलेला कलेचा हा वारसा पुढे नेण्यासाठी ईश्वराने शक्ती दिली यात मला समाधान वाटतं.
महाराष्ट्र ही संता ची भूमी आहे. या भूमीचा सन्मान कुठे ढळणार नाही याची जबाबदारी आजच्या युवा पिढीने घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असा महाराष्ट्र घडविण्याची ताकद आजच्या युवा तरुण पिढीत आहे. त्यामुळे व्यसन मार्गावर न जाता विविध कला शिक्षण क्षेत्राच व्यसन अंगिकारल पाहिजे असं त्या सांगतात.
समृद्धी सांगतात, त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. माध्यमिक ते उच्च माध्यमिक पर्यंतच शिक्षण कासार्डे व माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय फणसगाव येथे (B. Com) पर्यंत झाले. शिक्षण व संगित क्षेत्रा बरोबरच मला समाजसेवेची ही आवड आहे. व समाजसेवा ही माझ्या कुंटुंबचा अविभाज्य घटक आहे. माझे वडील श्री संतोष बाळकृष्ण चव्हाण देवगड तालुक्यातील वेळगिवे, वाघीवारे गावचे माजी सरपंच आहेत. त्यामुळे समाजिक, राजकीय क्षेत्रात ही आपल्याला आवड आहे. घराण्याचा वारसा आणि कुटुंबातील नातेवाईक आई, वडील यांच्या साथीमुळे भजन क्षेत्रात आता पर्यंत सिंधुदुर्ग ते मुंबई पर्यत १५० च्या आसपास डबलबारी सामने, संगीत सिंगल भजन, १० ते १२ भजन स्पर्धा श्री रामेश्वर पावणाई आई तुळजा भवानी प्रा. महीला भजन मंडळ वेळगिवे गावठणच्या माध्यमातून केल्या आहेत. यात भजन रसिक आणि श्रोत्यांनी मला चांगलीच पसंती दिली.
कुटुंबाच्या भजन कलेच्या तालमीत वाढलेल्या समृद्धी ला लहान पणा पासून गायनाची आवड. १५ व्या वर्षा पासून भजनाचे धडे घेण्यास सुरुवात केली. आपले आजोबा कै. ह.भ.प. गजानन चाळके गुरुजी यांच्याकडून वारकरी संप्रदायची आवड निर्माण झाली. वयाच्या १५ वव्या वर्षी सुप्रसिद्ध पखवाज वादक तालमणी श्री गणेशजी सावंत यांचे वडील भजन सम्राट कै. विलास पाटील बुवा यांचे पट्ट शिष्य प्रकाशजी सावंत बुवाकडे भजनाच शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिथून माझा भजनी कलाकार म्हणून प्रवास सुरु झाला.

कै. प्रकाशजी सावंत बुवा व कै. अंजनी प्रकाशजी सावंत यांनी मला स्वतःच्या मुलीप्रमाणे जीव लावला. तसेच कै. प्रमोद सावंत काका यांचा ही माझ्या या प्रवासामध्ये मोलाचा वाटा आहे. मला सुरवाती पासुनच संगिताला साजेस वादन लयबद्ध गायनाची आवड निर्माण झाली. यामध्ये तालमणी गणेश सावंत तसेच त्यांचे पट्ट शिष्य रविंद्रजी मेस्त्री आणि यांच्या तालमीत तयार झालेल्या कलाकारांनी मला माझ्या या प्रवासात कुंटुंबातील सदस्या प्रमाणे साथ दिली. त्यांचे योगदान मोलाच आहे. तसेच भजनाला शास्त्रीय गायनाच अंग असाव म्हणुन संगित अलंकार सन्मानीय अजित गोसावी यांच्याकडुन एक वर्षभर मोलाच मार्गदर्शन लाभल.
भजन क्षेत्राने मला समाजमध्ये वेगळी ओळख, मान सन्मान मिळवून दिला. मनुष्य जन्माला येऊन जीवनाचं सार्थक झालं. परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे भजन भगवंताच नामस्मरण. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ही कला जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे कु. समृद्धी सांगतात.


देवगड तालुक्यातील माझ गाव वेळगिवे व या गावामध्ये ऐतिहासीक श्री श्रीदेव रामेश्वराच जांभ्या खडकातीत मंदिर आहे. आणि हा आमच्या गावचा स्वाभिमान आहे. त्यांच्या जोडीला आई पावणाई, श्री देव आलोबानाथ यांच कृपा छत्र माझ्या बरोबर आहे. त्याच प्रमाणे माझ्या गावातील ग्रामस्थ यांचही मोलाच सहकार्य मला मिळत आहे. भजनाच प्रमुख अंग म्हणजे कोरस सुरवातीला मला माझ्या गावातील मुलींनी सहकार्य केल. त्यानंतर माझा हा प्रवास चालु असताना फणसगाव वाघिवरे गवाणे नाद पाळेकरवाडी या पंचक्रोशीतील मुलींनी कोरस साठी साथ दिली. कोरस मधील नवोदीत कलाकार तयार होत आहेत. त्यामुळे हा प्रवास अखंडीत पुढे चालु राहील याची मला खात्री आहे. या प्रवासामध्ये अनेक जेष्ठ नामवंत कलाकारांचा सहवास लाभला. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करेन ते म्हणजे भजन सम्राट प्रमोद हर्याण बुवा यांची मला वडीलां प्रमाणे साथ लाभली. त्यांच्या सहवासातून खुप काही शिकायला मिळाल. असेही त्या सांगतात. कले सोबत विनम्र स्वभाव ही त्यांना लाभलेली दैवी देणगी आहे.
नवरात्रोत्सवाच्या या शुभप्रसंगी कु. समृद्धी यांच्या भविष्यातील सर्व वाटचालीस अधिक यश मिळो, हीच देवी चरणी प्रार्थना !



कु. समृद्धी संतोष चव्हाण यांच्या पुढील वाटचालीसाठी स्काय न्यूज टुडे परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा….!
▪️अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग

