कुडाळ : जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा नेरूर माणकादेवी येथे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड केली. वृक्षारोपण लागवड कुडाळ - नेरूर येथील माजी विद्यार्थी संदीप रामचंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प.पू.प्राथमिक शाळा नेरूर माणकादेवी या ठिकाणी करण्यात आली.
यावेळी प्रसाद गावडे, स्वप्नील गावडे, किरण गावडे,अमित गावडे, महेश गावडे, उत्तम गावडे, विघ्नेश गावडे, दीपक गावडे, सचिन गावडे,गोट्या गावडे, विष्णू गावडे, आपा गावडे, विनय गावडे, सागर चव्हाण, यश गावडे, सुरजित गावडे यांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा माणकादेवी शाळेचे शिक्षक चारुशीला कुबल मॅडम, नम्रता राणे मॅडम, मानसी शिंदे मॅडम, मनाली गर्जे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

