Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

वालावल जिल्हा परिषद मतदारसंघात महविकास आघाडीची आढावा बैठक संपन्न

कुडाळ : वालावल जिल्हा परिषद मतदारसंघ ,महाविकास आघाडीची बैठक पार पडली. आघाडीतील प्रमुख आय.वाय.शेख यांच्या घरी या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. ही बैठक काँग्रेसचे ज्येष्ठ मार्गदर्शक एकनाथ उर्फ नाथा वालावलकर, शिवसेना शाखाप्रमुख सुनील करवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत , तसेच राष्ट्रीय जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आय.वाय.शेख यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागीय अध्यक्ष प्रा.सचिन पाटकर यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली
या बैठकीत संघटनात्मक क्रिया प्रक्रिया वाढविण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली, तसेच वालावल मतदार संघातील भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यात आला, यामध्ये वालावल बस स्थानकाच्या दरम्यान होणाऱ्या रिक्षा पार्किंगमुळे बस वालावल बाजारपेठ मध्येच न जाता बाहेरून नेण्यात येते, तसेच बसस्थानकाची शेड नादुरुस्त अवस्थेत आहे , रिपेरिंग करण्यासाठी ग्रामसभेत सूचना देऊनही याकडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही ,तलाठी ऑफिसही मोडकळीला आले आहे. गावासाठी देण्यात आलेली रुग्णवाहिका व व्यायाम शाळा ही हरवली आहे. गावातील पशुवैद्यकीय दवाखाना मोडकळीस आला असून वैद्यकीय अधिकारी नसल्याने बंद आहे. इलेक्ट्रिसिटी ऑफिस मध्ये मनमानी कारभार सुरू असून नळ योजना निकृष्ट दर्जाची आहे. नवीन योजनेचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. तसेच ठेकेदाराकडून उर्वरित पाईपची विक्री केल्यामुळे नियमित पाण्याची व्यवस्था नाही. क्षेत्रफळ वाढीतील पूल मोडकळीस आल्याने भविष्यात धोका उद्भवण्याची शक्यता असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते, यासोबतच गावातील स्ट्रीट लाईट ७० टक्के बंद अवस्थेत आहेत आणि प्रमुख बाब म्हणजे ग्रामसभेची सूचना जाहीरपणे दिली जात नसून सदस्यांपुरतीच मर्यादित ठेवून ग्रामसभा थोडक्यात आटोपली जाते, या सर्व गोष्टींवर सखोल चर्चा करून आघाडीच्या माध्यमातून न्याय हक्क मिळवण्यासाठी , आपण संपूर्ण आघाडीच्या माध्यमातून संघटित होऊया आणि संघर्ष करूया व गाव विकासाचे व्रत हाती घेऊया अशा पद्धतीचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी वालावल सोसायटीचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुडाळ तालुका उपाध्यक्ष राजन वालावलकर , राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष चैतन्य वालावलकर, राष्ट्रवादी बुथ अध्यक्ष मनोहर वालावलकर, राष्ट्रवादी युवक सागर वालावलकर, सेना उपशाखाप्रमुख रवींद्र कावळे ,उपशाखाप्रमुख विठ्ठल घारे, वालावल संघटक सागर पाटकर, युवा सेना अध्यक्ष हेमंत वालावलकर, पूजा राऊळ, बूथ प्रमुख विलास चौधरी ,दादू कोळंबकर, सुनील नेरुरकर ,अण्णा करवडकर, शमशुद्दीन शेख ,गोविंद पेडणेकर, प्रमोद आडेकर ,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल घारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार हेमंत वालावलकर यांनी मानले.

ruchira top