Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

नामांकित बुवांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा ,भजन महर्षी कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मृतिप्रित्यर्थ आयोजन

उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते दत्ता सामंत पुरस्कृत स्पर्धा : घुमडे ग्रामस्थ मंडळाचे आयोजनाचे दहावे वर्ष

दिपिका देऊलकर | मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे येथील श्री देवी घुमडाई मंदिर येथे दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या 'श्रावणधारा' या कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते देवदत्त उर्फ दत्ता सामंत पुरस्कृत, घुमडे ग्रामस्थ मंडळ आयोजित आणि भजन महर्षी कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मृतिप्रित्यर्थ नामांकित बुवांची, जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

घुमडे येथील घुमडाई मंदिरामध्ये श्रावण मंगळवारी या भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष असून जिल्ह्यातील अनेक नामांकित भजन मंडळ यामध्ये सहभागी होणार आहेत.६ ऑगस्ट पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही या निमित्ताने करण्यात आले आहे.

मंगळवारी ६ ऑगस्ट सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता श्री भगवती प्रासादिक भजन मंडळ, आंबेरी - मालवण (बुवा - अमित डिचोलकर), सायंकाळी ६ वाजता श्री गांगेश्वर कृपा भजन मंडळ, श्रावण मालवण (बुवा -विश्राम घाडी), सायंकाळी ७ वाजता श्री मुळपुरूष प्रासदिक भजन मंडळ, वडखोल - वेंगुर्ले (बुवा - पुरुषोत्तम परब), रात्रौ ८ वाजता श्री चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ, वायंगणी -वेंगुर्ले ( बुवा - अनिकेत भगत यांची भजने होणार आहेत.

मंगळवार १३ ऑगस्ट सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद त्यानंतर सायंकाळी ५ वाजता श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ, वर्दे - कुडाळ ( बुवा - अद्वैत पालव), सायंकाळी ६ वाजता स्वरसंगम प्रासादिक भजन मंडळ, कासरल- कणकवली(बुवा - अमोल चव्हाण, सायंकाळी ७ वाजता श्री लक्ष्मीनारायण प्रासादिक भजन मंडळ, वालावल- कुडाळ (बुवा - सूरज लोहार) रात्रौ ८ वाजता
श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, वेलें-बांदा (अक्षय कांबळी) यांची भजने होणार आहेत.

मंगळवार २० ऑगस्ट सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद त्यानंतर सायंकाळी पाच वाजता श्री दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ, वैभववाडी (बुवा - विराज तांबे), सायंकाळी ६ वाजता श्री देवी ईस्वटी प्रासादिक भजन मंडळ, मातोंड- वेंगुर्ले (बुवा - सचिन सावंत), सायंकाळी ७ वाजता श्री भगवती प्रासादिक भजन मंडळ, बांव कुडाळ (बुवा - लक्ष्मण नेवाळकर), रात्रौ ८ वाजता श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी कुडाळ ( प्रसाद आंबडोसकर) यांची भजने होणार आहेत.

मंगळवार २७ ऑगस्ट सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद त्यानंतर सायंकाळी ५ वाजता श्री पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, फोंडा घाट- कणकवली ( बुवा - हेमंत तेली), सायंकाळी ६ वाजता श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ, माजगाव सावंतवाडी (बुवा - कुणाल वारंग), सायंकाळी ७ वाजता श्री नादब्रह्म प्रासादिक भजन मंडळ, कसाल(बुवा - सुंदर मेस्त्री ) रात्रौ ८ वाजता श्री देवी माऊली प्रासादिक भजन सेवासंघ, इंसुली सावंतवाडी ( बुवा - वैभव राणे ) यांची भजने होणार आहेत.

गुरुवार २९ ऑगस्ट रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद आणि त्यानंतर सायंकाळी ७ वाजता संयुक्त दशावतारांचा महान पौराणिक संघर्षमय दशावतारी नाट्यप्रयोग भीषण स्वरुपी राजयक्षमा सादर होणार आहे. यामध्ये दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे.

मंगळवार ०३ सप्टेंबर सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद व त्यानंतर सायंकाळी ५ वाजता भजन स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ होणार असून सायंकाळी ७ वाजता संयुक्त दशावतारांचा महान पौराणिक संघर्षमय दशावतारी नाट्यप्रयोग चिंतामणी जन्म अनेक दिग्गज कलाकारांसोबत सादर होणार आहे. तरी श्री देवी घूमडाई मंदिरात होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यास भाविक व भजन रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

ruchira top