मालवण : घुमडे वस्तवाडी येथील श्री देवी भवानी मंदिरात नवरात्री उत्सवानिमित्त २८ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता विठ्ठल रखुमाई महिला वारकरी भजन मंडळ खैदा (बुवा- गोपाळ पाटकर यांचे भजन, ७.३० वाजता श्री भवानी देवी प्रासादिक भजन मंडळ, बस्तबाडी घुमडे (बुवा- चंद्रशेखर वस्त, पखवाज- अमित वस्त) यांचे भजन, रात्री ९ वाजता श्री ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ कांदळगाव कातवड (बुवा मंगेश नलावडे, पखवाज- सोहम धुरी) यांचे भजन सादर होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन आई भवानी मित्रमंडळ, वस्तवाडी यांनी केले आहे.

घुमडे वस्तवाडी येथील भवानी मंदिरात २८ रोजी कार्यक्रम
