Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यक्रमाचे आज मालवण तहसील कार्यालयात आयोजन

उमेदवार नोंदणी कॅम्प ; लाभ घेण्याचे तहसिलदार वर्षा झालटे यांचे आवाहन

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन महसूल विभागामार्फत 1ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2024 या कालावधी मध्ये महसूल पंधरवडा साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले असुन जिल्हा स्तरावरील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या कार्यक्रमाचे आयोजन 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 5 या वेळात तहसिलदार कार्यालय मालवण येथे करण्यात आले आहे.

उमेदवार नोंदणी कॅम्प प्रशिक्षणातून प्रगतीकडे

सिधुदुर्ग जिल्हयातील शासकीय निमशासकीय कार्यालये, महामंडळ अशा प्रत्येक कार्यालयात किमान 1 उमेदवार व कमाल मंजूर पदांच्या 5 टक्के उमेदवार या योजनेंतर्गत भरले जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय, कौशल्य विकास कार्यालय या सर्व नगरपालिका, नगरपंचायत, विद्युत वितरण, जिल्हापरिषद अंतर्गत सर्व कार्यालये व पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालय, कृषी विभाग, बांधकाम विभाग, महिला व बाल विकास विभाग, भुमी अभिलेख, आरोग्य विभाग, शासकीय मेडीकल कॉलेज, जिल्हा उद्योग केंद्र यासारखे जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे यांचेकडील रिक्तपदे भरण्यांत येणार आहेत. आज रोजी 560 रिक्तपदे पोर्टलवर अधिसूचित केली आहेत. यात Clerk, Data Entry Operator, Electrician, Wireman, Driver, Engineer, Agriculture Related, Nurse, Peon, Security Guard, Warden, Animal Husbandary Related, Accountant, Plumber, Fitter, Mechanic, Turner, Sweeper, Barber, Tailor यासारख्या विविध पदांचा समावेश आहे. त्याकरिता बारावी, आयटीआय व डिप्लोमा उत्तीर्ण, पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांची निवड करण्यांत येणार आहे.

12 वी पास उमेदवारांना दरमाह रु. 6 हजार आयटीआय पास रु. 8 हजार व पदवी व पदव्युत्तर पास यासाठी 10 हजार विद्यावेतन सहा महिन्यांसाठी दिले जाणार आहेत. उमेदवारांना सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

उमेदवारांच्या नोंदणीकरीता सदर कॅम्पमध्ये उमेदवारांची निशुल्क नोंदणी करून देण्यांत येणार आहे. नोंदणीकरीता शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांनी आधार कार्ड, दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक कागदपत्रांच्या छायाप्रतीसह तहसिल कार्यालय मालवण येथे उपस्थित रहावे. ज्यांची ऑनलाईन वरील पोर्टलवर नोदणी झालेली आहे अशा उमेदवारांना ऑनलाईन संबंधित पदांकरिता Apply करून दिले जाईल.

मालवण तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र युवक युवतींनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा या कॅम्पमध्ये उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार वर्षा झालटे यांनी केले आहे

ruchira top