मसुरे मेढावाडी येथील अनिरुद्ध बागवे कुटुंबीयांना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते मदत सुपूर्द
मसुरे : मसुरे येथील अनिरुद्ध बागवे यांच्या राहत्या घरावर झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत बागवे कुटुंबीयांना सोबत असल्याचा विश्वास देत आर्थिक मदत सुपूर्द केली. तसेच शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नाशील असल्याचे सांगितले. जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहू असे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले.
संकटकाळी शिवसेना नेहमी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते, असे सांगत अनिरुद्ध बागवे यांनी शिवसेना परिवाराचे आभार मानले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मसुरे विभागप्रमुख राजेश गावकर, उपविभागप्रमुख सुहास पेडणेकर, सिद्धेश मांजरेकर युवासेना उपविभागप्रमुख आयवान फर्नांडीस, दिनेश बागवे, युवतीसेना विभागप्रमुख आर्या गांवकर, मामी पेडणेकर, राजू सावंत, मधुरा दिनेश बागवे,अनिल बागवे, मकरंद वायंगणकर उपस्थित होते

