गोळवण,कुमामे, डिकवल येथे "फार्मर्स आयडी"नोंदणी.
संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील गोळवण,कुमामे, डिकवल येथील शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत जिल्हा महसूल प्रशासनाच्या वतीने कुडाळ उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गोळवण ग्रामपंचायत सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मंडळ अधिकारी पेंडूर व ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल सेवक , कृषी सहाय्यक, पोलिस पाटील तसेच महा ई सेवा केंद्र वराड श्री राजन वराडकर, प्रविण मिठबावकर यांनी गोळवण,कुमामे , डिकवल येथील शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी केली.
या वेळी उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे , तहसीलदार वर्षा झालटे यांनी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेचे महत्व आणि गरज पटवून दिले व सर्वांनी या योजनेंतर्गत आपली फार्मर्स आयडी नोंदणी करावी असे आवाहन केले. सरपंच सुभाष लाड यांनी उपस्थित अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी व शेतकरी ग्रामस्थ यांचे आभार मानले.

