Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार "नैसर्गिक शेतीचे" धडे..!

मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार "नैसर्गिक शेतीचे" धडे..!

संजय माने | पोईप : विषमुक्त अन्न उत्पादन ही आजच्या काळातील प्राथमिक गरज ठरली असून, रासायनिक खते व औषधांचा अवाजवी वापर, सेंद्रिय खतांचा अपुरा पुरवठा व परिणामी जमिनीची कमी होत चाललेली सुपीकता या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

मालवण तालुक्यातील चार ग्रामपंचायत क्षेत्रांतील सहा गावांमध्ये २०२५-२६ पासून या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू होणार आहे अशी माहिती मालवण तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समिती बैठकीत मंजूर झालेल्या व राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानासाठी निवडलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत. तिरवडे,नांदोस,गोळवण, कुमामे,डिकवल,तळगाव.या अभियानांतर्गत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून नैसर्गिक शेतीच्या संकल्पना दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे.

गाव पातळीवर प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान १२५ शेतकरी निवडून त्यांना कमाल एक एकर क्षेत्रामध्ये नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात पुढील दोन वर्षांत मालवण तालुक्यात सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या जनजागृतीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी व कृषी सखी यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना काडी-कचऱ्या पासून सेंद्रिय खत तयार करणे, जीवामृत, दशपर्णी अर्क यांसारखी पीक संरक्षण औषधे गावातच तयार करणे याचे प्रशिक्षण दिले जाणार असून, आवश्यक तेथे अनुदानही उपलब्ध करून दिले जाणार आहे. परिणामी, नैसर्गिक पद्धतीने तयार झालेल्या शेतमालाला भविष्यात अधिक मागणी व उत्तम दर मिळण्याची अपेक्षा आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी मालवण श्री. अमोल करंदीकर यांनी दिली.

ruchira top