वैभववाडी / प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण विद्यालय आचिर्णे येथील इयत्ता १० वी च्या १९८३-८४ बॅचच्या माजी विद्यार्थीचे स्नेहसंमेलन तब्बल ४० वर्षांनी उत्साहात पार पडले.जुन्या आठवणींना माजी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी प्रिंटर प्लस झेरॉक्स मशीन शाळेला भेट दिली.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. माजी विद्यार्थी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, सदानंद गुरव,उदय रावराणे,सेवानिवृत्ती पोलिस उपनिरीक्षक बळीराम चव्हाण, उत्तम सुतार,विजय पवार, प्रकाश पवार,मोहन पवार, कृष्णा बुकम, विजय मोरे, नारायण जाधव, वसंत कदम, सविता रावराणे, आदी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रशेखर कारेकर सर व इतर शिक्षक वर्ग शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.जुने मित्र भेटल्यामुळे माजी विद्यार्थी ४० वर्षांपूर्वीच्या आठवणीत मंत्रमुग्ध झाले होते.एकमेकांची विचारपूस करीत शेवटी जड अंतःकरणाने पुन्हा एकत्र येण्याच्या निर्धार करीत एकमेकांचा निरोप घेतला, यावेळी श्री दिलीप रावराणे, श्री उत्तम सुतार श्री बळीराम चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रशेखर कारेकर सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या शाळेत आचिर्णे, खांबाळे, गडमठ, लोरे नं २ इतर गावचे पण माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उदय रावराणे तर आभार श्री सदानंद गुरव यांनी मानले .