श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अंकुर हाँस्पिटल झाट्ये क्लिनिक यांचा उपक्रम
मालवण | : मालवण सोमवार पेठे येथील श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अंकुर हाँस्पिटल झाट्ये क्लिनिक यांच्या सयुक्त विद्यमानाने शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत लहान मुलांची ( वयोगट १८ वर्षाखालील ) मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आयुष्यमान कार्ड मोफत करण्यात येणार आहे. गरजू व्यक्तींना मोफत औषध वाटप करण्यात येणार आहे.
या मोफत शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सोमवार पेठ मालवण. यांच्या वतीने करण्यात आले आहे.

