संजय माने |पोईप : मालवण तालुक्यातील गोळवण वरची गावडेवाडी येथील रिक्षा व्यावसायिक संतोष गावडे वय ५१ यांचे शनिवारी दुपारी कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात निधन झाले. मागिल काही दिवस संतोष गावडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संतोष गावडे यांनी गोळवण येथे पोल्ट्री व्यवसाय चालू करून आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण केले होते. ते या परिसरात उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून परिचित होते. गोळवण येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमात ते नेहमीच सक्रियपणे सहभागी होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन भाऊ, भावजया,पुतणे, असा परिवार आहे.
भाजप मालवण तालुका जेष्ठ पदाधिकारी अभिमन्यू गावडे तसेच गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान वराडकर इंग्लिश मिडीयम हायस्कूलचे शिक्षक रविकुमार गावडे यांचे ते बंधू तर गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या अनिता गावडे यांचे ते दिर होत.

