Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवात वैभववाडी महाविद्यालयाची चमकदार कामगिरी

मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवात वैभववाडी महाविद्यालयाची चमकदार कामगिरी

वैभववाडी :प्रतिनिधी मुंबई विद्यापीठ आयोजित ५८ वा युवा महोत्सव-२०२५ कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला. या युवा महोत्सवात वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाने चमकदार कामगिरी करून विजयाची परंपरा कायम ठेवली आहे.

या महोत्सवात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध कला प्रकार, संगीत, नृत्य, नाट्य आणि सांस्कृतिक स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपला कला सादर केली. या महोत्सवात वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

ललितकला विभागातील मेहंदी कला प्रकारात कु.दीपा तेली हिने द्वितीय क्रमांक पटकावला. संगीत विभागात कु.हर्ष नकाशे याने सुगम गायन व भारतीय शास्त्रीय गायनात प्रथम क्रमांक मिळवून आपली बहुगुणी प्रतिभा सादर केली. तसेच नाट्यसंगीतात प्रभावी सादरीकरण करून द्वितीय क्रमांक पटकावला.

या यशामुळे वैभववाडी महाविद्यालयाचे नाव केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर मुंबई विद्यापीठाच्या पातळीवर पोचवले आहे. संस्थेचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग. शिक्षेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच पुढील शैक्षणिक आणि कलात्मक प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या कामगिरीमुळे वैभववाडी महाविद्यालयाने सांस्कृतिक, कलात्मक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, या विद्यार्थ्यांच्या यशामुळे महाविद्यालयाचा अभिमान अधिकच उंचावत आहे.

ruchira top