Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

शिवसेनेच्या वतीने कुडाळात गणेश सजावट स्पर्धा

शिवसेनेच्या वतीने कुडाळात गणेश सजावट स्पर्धा

आमदार निलेश राणे यांनी केलीय स्पर्धा पुरस्कृत

वॉर्ड निहाय आणि अंतिम अशा दोन फेऱ्यात होणार स्पर्धा

कुडाळ : आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ नगरपंचायत क्षेत्र मर्यादित गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन फेरीमध्ये होणार आहे. पहिली फेरी ही वॉर्डनिहाय असणार आहे. १७ वार्डमधील गणेश सजावट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणरायांचे परीक्षण होणार आहे. या वॉर्डनिहाय स्पर्धेमध्ये प्रत्येकी तीन क्रमांक काढले जाणार आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये ३ हजार, द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये २ हजार, तृतीय क्रमांकासाठी रोख रुपये १ हजार अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.


वॉर्ड मधील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना अंतिम फेरीमध्ये म्हणजे दुसऱ्या फेरीत सहभागी करून घेतले जाणार आहे आणि १७ वार्डातील १७ गणरायांचे परीक्षण करून यामधून पुन्हा तीन क्रमांक काढले जाणार आहेत. या प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये १५ हजार व चषक द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये १० हजार व चषक तृतीय क्रमांकासाठी रोख रुपये ५ हजार व चषक अशी पारितोषिके असणार आहेत.


या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गुरुवार २८ ऑगस्ट पर्यंत नाव नोंदणी करावी. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी युवा सेनेचे शहर प्रमुख आबा धडाम (९४०४१६६८६८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

ruchira top