
गगनबावडा कोल्हापूर मार्ग ठप्प; पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर कायम
वैभववाडी: पंकज मोरे कोकणात गेल्या आठवडाभरा पासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. नदी नाल्यांना महापूर आल्याने पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी मध्यरात्री पासूनच पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली दरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग ठप्प झाला आहे.
गेल्या सात दिवसा पासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे गगनबावाडा दरम्यान मांडुकली, किरवे, लोंघे येथे सोमवारी मध्यरात्री पासून रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे.तर पावसाची संततधार कायम सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

