वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता

कोकण : कोकण किनारपट्टीवर सोमवार १८ ऑगस्ट ते शुक्रवार २२ ऑगस्ट दरम्यान वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीत समुद्रातील वाऱ्याचा वेग ४५ ते ५० कि.मी. प्रती ताशी राहणार असून तो ६५ कि.मी. प्रती ताशी पर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून या कालावधीत समुद्र वादळी वाऱ्यासह खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून सुरक्षेच्या कारणास्तव खोल समुद्रात जावू नये. तसेच किनाऱ्यालगतच्या नागरिकांनीही खबरदारी घ्यावी !! असे पत्र महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी प्रादेशिक उपयुक्त तसेच सर्व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांना दिले असून मच्छिमार व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

