संजय माने | पोईप : भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा खोटले व पंचशील ट्रस्ट यांच्या वतीने खोटले गावामध्ये वर्षावास कार्यक्रम विविध उपक्रमाने नुकताच संपन्न झाला. या वर्षावास कार्यक्रमामध्ये मुंबई येथून आलेले पूज्य भंते प्रज्ञावंत यांनी प्रवचन केले. या वेळी अजगनी गावातील आयुष्यमान संतोष तांबे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये श्रद्धावान उपासक उपासिका यांनी पूज्य भंतेजी यांना याचना करून , धम्म समजून घेतला. धम्मदेसना व भोजनदान करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभा गाव शाखेचे अध्यक्ष आयु. संजय खोटलेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ कदम, सचिव प्रा. वैभव कदम, अशोक जाधव, राहुल कदम, बौद्धाचार्य शशिकांत कदम, अनंत कदम, रामगड गाव शाखेचे जेष्ठ सभासद ज्ञानदेव जाधव, महेश जाधव.तक्षशिला महिला कार्यकारणीच्या सदस्या स्मिता कदम, अमिता जाधव, आरती कदम, मनाली कदम, रूपाली कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

