Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

फ्रिज, वॉशिंग मशीन, फॅन यांसह सोन्या चांदीची बक्षिसे

फ्रिज, वॉशिंग मशीन, फॅन यांसह सोन्या चांदीची बक्षिसे

भारतीय जनता पार्टी मालवण तालुका आयोजित महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा

मालवण बंदर जेटी येथे 8 ऑगस्ट रोजी भव्यदिव्य आयोजन

भाजपा मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : मालवणात भाजप तर्फे नारळी पौर्णिमा उत्सव निमित्ताने महिलांसाठी भव्यदिव्य स्वरूपात नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सव विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे. महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा, पर्यटन महासंघाच्या वतीने रिक्षा व्यवसायिकांसाठी पर्यटन सांस्कृतिक रॅली, रिक्षा सजावट स्पर्धा, श्रीफळ पूजन व अर्पण तसेच 'एक राखी लाडक्या देवाभाऊंसाठी' असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपचे मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालवण येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. भाजपा तालुका उपाध्यक्ष केदार झाड, मनोज मेथर, महिला शहर अध्यक्षा अन्वेषा आचरेकर, पर्यटन महासंघ तालुकध्यक्ष मंगेश जावकर, युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, पप्या कद्रेकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्था अध्यक्ष सहदेव साळगावकर, मिलिंद झाड, रवींद्र खानविलकर, माजी नगरसेविका पूजा सरकारे, महिमा मयेकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, ललित चव्हाण, रामा चोपडेकर, कॅलिस फर्नांडीस आदी उपस्थित होते.

यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, भाजप मालवण तालुक्यातर्फे नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा ८ ऑगस्टला दुपारी ३ वाजता मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आली आहे. यात प्रथम पारितोषिक- रेफ्रिजरेटर, द्वितीय पारितोषिक- वॉशिंग मशीन, तृतीय पारितोषिक- फॅन, उत्तेजनार्थ फॅन अशी आकर्षक बक्षिसे आहेत. तसेच सहभागी होणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला असून त्यातील विजेत्यांसाठी प्रथम - सोन्याची नथ, द्वितीय- चांदीचा करंडा, तृतीय- चांदीचा छल्ला अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी नारळ आयोजकांकडून दिले जातील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सौ. अन्वेशा आचरेकर ८१८०९६६८३३, महिमा मयेकर - ९४०५६२४७००
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बाबा मोंडकर यांनी केले.

पर्यटन सांस्कृतिक रिक्षा रॅली

जिल्ह्याच्या पर्यटन वाढीत रिक्षा व्यवसायिकांचे मोठे योगदान आहे. रिक्षा व्यवसायिकांच्या सन्मानासाठी पर्यटन महासंघ, तारकर्ली पर्यटन विकास संस्था, रिक्षा व्यावसायिक संघटना व भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने गेली चार वर्षे नारळी पौर्णिमे दिवशी रिक्षांची पर्यटन सांस्कृतिक रॅली काढण्यात येते. यावर्षी देखील दि. ८ रोजी भरड नाका ते बंदर जेटी अशी रॅली काढण्यात येणार आहे. भरड नाक्यावर दुपारी २.३० वाजता भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते या रॅलीचे उदघाटन होईल. यानिमित्त उत्कृष्ट रिक्षा सजावट स्पर्धा घेण्यात येणार असून प्रथम क्रमांकास रु. १० हजार व द्वितीय क्रमांकास रु. ५ हजार तसेच इतर उत्तेजनार्थ बक्षिसे व सहभागी होणाऱ्या रिक्षा चालकांना सहभाग सन्मान धन देण्यात येणार आहे. रिक्षा रॅली नंतर बंदर जेटीवर रिक्षा व्यावसायिक तसेच रीलस्टार, युट्युबर्स यांच्या हस्ते श्रीफळ पूजन करून सागरास अर्पण करण्यात येणार आहे. रिक्षा रॅलीत व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहदेव साळगावकर ९४२०९३५०५०, पप्या कद्रेकर - ९८२३०९६१५६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मोंडकर यांनी केले.

'एक राखी लाडक्या देवाभाऊ साठी'

भाजपने राज्यात घेतलेल्या विविध विकासात्मक निर्णयांचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते, यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून 'एक राखी लाडक्या देवाभाऊ साठी' हा उपक्रम राबविला जाणार असून मालवण शहर व तालुक्यातील एकूण १२१ बूथ वरून १०० राख्या व शुभसंदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपतर्फे पाठविण्यात येणार आहे. मालवण बंदर जेटी येथे नारळी पौर्णिमेदिवशी नारळ लढविणे स्पर्धेच्या दरम्यान ४ वा. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती यावेळी बाबा मोंडकर यांनी दिली.

  • अमित खोत, मालवण

ruchira top