Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

बागायत येथील पथदीवे (स्ट्रीट लाईट)आठ दिवस बंद. बाजारपेठ काळोखात : ग्रामस्थ आक्रमक

बागायत येथील पथदीवे (स्ट्रीट लाईट)आठ दिवस बंद. बाजारपेठ काळोखात : ग्रामस्थ आक्रमक

भाऊ भोगले | बागायत : माळगाव ग्रामपंचायत हद्दीतील बागायत येथील संपूर्ण परिसरातील पथदिवे (स्ट्रीट लाईट) गेले आठ दिवस पूर्णतः बंद आहेत. म्हणून बागायत बाजारपेठ काळोखात असल्याने स्थानिक ग्रामस्थ व्यापारी आक्रमक होऊन ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले व त्यांनी सरपंच ,ग्रामसेवक यांना जाब विचारला असता समाधान कारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थानी घरपट्टी न भरण्याचा निर्णय घेतला आहे.
बागायत ही माळगावची वाडी असून बाजारपेठेचे ठिकाण म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. मालवण बेळणे रस्ता, चौके ,आणि कुणकावळे साठी जाण्याचे रस्ते येथून आहेत. ग्रामपंचायत कार्यालय ,तलाठी कार्यालय पोष्ट ऑफिस,रेशन दुकान, शाळा, डॉक्टर,मेडिकल, बँक, महा ई सेवा केंद, सरकार मान्य दारू दुकाने, किराणा मालाची दुकाने , हॉटेल,कोल्ड्रिंक्स,आणि इतर सर्व
दुकानांनी बाजारपेठ वसलेली असल्याने येथे दिवसा रात्री वर्दळ सुरू असते . तसेच पहाटे मालवणला कॉलेज साठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.हे विद्यार्थी आजूबाजूच्या गावातून चालत येतात व बागायत येथे थांबतात आणि म्हणून संपूर्ण बाजार परिसर तसेच जोड रस्त्यावर, वस्तीवर पथदिवे बसविलेले आहेत. .
आठ दिवसांपूर्वी या परिसरातील सलग आठ दिवस चोवीस तास पथदिवे सुरू होते तर गेले आठ दिवस हे पथदिवे चोवीस तास बंद आहेत मात्र ग्रामपंचायत सरपंच ,ग्रामसेवक, सदस्य,कर्मचारी तसेच स्थानिक वायरमन यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले .
खरे पाहता ग्रामपंचायत माळगाव यांना संपूर्ण गावापेक्षा एका बागायत वाडीची घरपट्टी आणि लाईट कर सगळ्यात जास्त गोळा होतो . मात्र त्या दृष्टीने या वाडीमध्ये त्याच्या पाव टक्के सुद्धा निधी खर्च होत नाही किंवा कामे झालेली नाहीत. असे असताना एकमेव ग्रामपंचायतीची असलेली पथदिवांची सेवा तरी सुरळीत मिळावी हि ग्रामस्थांची अपेक्षा आहे. वर्षभर गेलेले बल्ब बदलले जात नाहीत ,फक्त गणेशोत्सव आला की बल्ब बदलले जातात ते पण जाऊन सांगावे लागतात .असे असल्याने सर्व बागायत वासियानी घरपट्टी न भरण्याचा पवित्रा घेतलेला आहे .

ruchira top