Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

रानभाजी पाककला स्पर्धेस श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

रानभाजी पाककला स्पर्धेस श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

भाऊ भोगले | बागायत : श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत रानभाजी पाककला स्पर्धा संपन्न झाली.
रानभाज्या या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. रानभाज्यांच्या सेवनाने कितीतरी दुर्धर आजारांवर आपण मात करू शकतो. आयुर्वेदामध्ये याला फार महत्त्व आहे . याचे महत्त्व आणि जनजागृती करण्याचे कार्य गेली कित्येक वर्ष या प्रशालेत सुरू आहे.
रानभाजी पाककला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी रानभाज्यांपासून नाविन्यपूर्ण पाककृती बनवल्या होत्या. यामध्ये अळूवडी, मिक्स भाजी समोसे, शेवग्याच्या पानांचे सूप,शेवग्याच्या पानांचे घावणे, मोमोज, फोडशीची भजी, घोट्याच्या वेलीची भाजी, अळूच्या गाठी, टाकळ्याची भजी, कुर्डूवडी, दुदुर्ल्याची भाजी,पेवगा पराठा, इ. नानाविध पाककलांचे प्रदर्शन मांडण्यात आले.
या स्पर्धेमध्ये एकूण 45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये कुमारी नेहा सतीश पालव(शेवग्याच्या पानांचे सूप )-प्रथम क्रमांक
कुमारी श्रावणी महेश सावंत( बांबूच्या कोंबांचे कटलेट)-द्वितीय क्रमांक
कुमारी वैदेही श्रीनिवास हडकर (शेवग्याच्या पानांची वडी )-तृतीय क्रमांक
कुमार श्रवण महेश सावंत( घोट्याच्या वेलीची वडी)- उत्तेजनार्थ असे अनुक्रमे क्रमांक काढण्यात आले.
या स्पर्धेसाठी सौ.सोनाली सचिन पाताडे (शाळा व्यवस्थापन समिती- अध्यक्षा) व सौ पूर्वा मंगेश पाटकर (शाळा व्यवस्थापन समिती -सदस्या )यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सहभागाबद्दल तसेच त्यांनी घेतलेली मेहनत याचे मान्यवर परीक्षकांनी भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रसाद कुबल यांनी विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्त्व पटवून सांगितले. रानभाज्या या पावसाळ्यात सहजरित्या प्राप्त होत असल्या तरी त्याचे जतन करणे हे महत्त्वाचे आहे. असे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. प्रशालेतील शिक्षिका वेदिका दळवी व प्रतिभा केळूसकर तसेच माजी विद्यार्थी, पालक हे उपस्थित होते.

ruchira top