Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी बागायत येथील पूर परिस्थितीची केली पाहणी

मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी बागायत येथील पूर परिस्थितीची केली पाहणी

भाऊ भोगले | बागायत : रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्रच पूर परिस्थिती निर्माण झालेली असल्याने बागायत येथील विठ्ठलादेवी पूलानजीक नेहमीच पुराच्या पाण्याने वाहतूक ठप्प होते.तसेच आजुबाजूच्या घरांना पुराच्या पाण्याचा धोका असल्याने मालवण तहसीलदार श्रीम. वर्षा झाल्टे यांनी भेट देऊन स्थानिकांशी विचारपूस केली. तसेच पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षितता बाळगा ,पाण्यात फिरू नका ,काळजी घेण्यास सांगितले .
पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी भौगोलिक परिस्थितीचा आढावा स्थानिकांकडून घेतला .यावेळी उपस्थितांनी नाल्यातील गाळ उपसा होणे आवश्यक असून पुलाच्या दोन्ही बाजूला बॉक्सेल करून पाणी नियमित निचरा होऊ शकते अशी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे सांगितले .
पूर परिस्थिती किंवा पावसाळ्यात बांधकाम विभागाचे कोणीही अधिकारी पाहणी करत नसल्याने अशा प्रकारचे अडथळे निर्माण होत असल्याचे स्थानिकांनी तहसीलदारांना सांगितले उन्हाळ्यामध्ये सर्वे करून चुकीच्या पद्धतीने रस्ते बनविले जातात व त्याचा त्रास स्थानिक तसेच शेतकऱ्यांना सहन करावा लागतो त्यामुळे पूर परिस्थिती असताना रस्त्याची रचना तसेच बॅक वॉटर ची सोय कशी करता येईल याचे नियोजन होऊ शकते मात्र तसे न करता चुकीच्या पद्धतीने रस्ते बनविले जात असल्याचे स्पष्ट केले .
यावेळी कोळंब मंडळ अधिकारी मिनल चव्हाण, तहसील कार्यालय लिपिक शिल्पा मसुगडे, माळगाव महसूल सेवक श्री. नाईक ,परेश पारकर, विश्वनाथ भोगले ,वशिष्ठ भोगले उपस्थित होते

ruchira top