भाऊ भोगले | बागायत : महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ आयोजित राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत जि. प. प्रा.शाळा कुणकवळे या शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कु. शंकर विलास सरनाईक याने सिल्व्हर कॅटेगरी प्रमाणपत्र प्राप्त यादीत स्थान मिळविले. जिल्ह्यातील निवडक शाळांमधील विद्यार्थी या परीक्षेत पात्रताधारक ठरले.
या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती कुणकवळे,शिक्षक पालक संघ,माता पालक संघ,सर्व ग्रामस्थ कुणकवळे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.तसेच पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.
गणित विषयाचा पाया भक्कम करणारी आणि विशेष दर्जा असलेली अशी ही परीक्षा असून गणित प्राविण्य परीक्षेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र होतात

राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत कु.शंकर सरनाईक याचे सिल्व्हर कॅटेगरी प्रमाणपत्र यादीत स्थान
