Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

पोईप गोळवण मार्गावरील मोरी खचली

पोईप गोळवण मार्गावरील मोरी खचली

जिल्हापरिषद माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी केली पाहणी

संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील पोईप येथे मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या अतिवृष्टीने पोईप गोळवण कट्टा मुख्य मार्गावरील पोईप धरणानजीक असलेली मोरी (कॉजवे) अवजड वाहनांच्या वाहतुकीने खचून आतील पाईप फुटल्याने या मार्गावरून वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने याची त्वरित दखल घेऊन या कॉजवेबाबत उपाययोजना करावी अशी मागणी माजी जिल्हापरिषद बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी केली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी मालवण बेळणे मार्गावरील विरण येथील पुलाची संरक्षक भिंत कोसळल्याने या पुलावरून अवजड वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. यामुळे मसदे तिठा-गोळवण-पोईप अशी एसटी बस व अवजड वाहनांची वाहतूक चालू करण्यात आली आहे. यामुळे गेल्या कित्येक वर्षांचा हा कॉजवे अवजड वाहनांच्या वाहतुकीने पूर्णतः खचला असून आतील पाईपही फुटले असून डांबरीकरणाला भेगा पडल्या आहेत. याबाबत शनिवारी दुपारी या भागाचे लोकप्रतिनिधी तथा माजी जि प बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी या कॉजवेच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी कॉजवेवर पडलेल्या खड्ड्यात चिरे टाकून तात्पुरती उपाययोजना केली आहे. परंतु यावरून वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे. यामुळे संबंधित बांधकाम विभागाने याची दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी कांदळकर यांनी केली आहे. सध्या विरण पुलावरून अवजड वाहतूक बंद असून या कॉजवे वरूनही वाहतूक बंद पडल्यास प्रवासी, विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होणार आहे. याबाबत बांधकाम विभागाने याची त्वरित दखल घेऊन उपाययोजना करावी. हा रस्ता वाहतुकीस बंद झाल्यास गोळवण पोईप बरोबरच इतर परिसरातील एसटीच्या प्रवाशांना व विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे.

ruchira top