रत्नागिरी : राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवरुख येथील मराठा भवन येथे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.
यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आ. शेखर निकम, सौ. नीलमताई राणे, माजी आमदार प्रमोद जठार, सुभाष बने, सदानंद चव्हाण, राजेंद्र महाडिक यांच्यासह भाजपा शिवसेना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेद पठण आणि केक कापून राणे साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

