Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

सौ. ममता लक्ष्मण देसाई ठरल्या "वालावल सौभाग्यवती"

सौ. ममता लक्ष्मण देसाई ठरल्या "वालावल सौभाग्यवती"

"युवा संघर्ष मित्र मंडळ, वालावल" च्या वतीने आयोजन

५० स्पर्धकांमध्ये पार पडली स्पर्धा

आदित्य बटावले | वालावल : ८ मार्च २०२५ आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून युवा संघर्ष मित्र मंडळ, वालावल च्या वतीने प्रथमच वालावल गावात गावातील महिलांसाठी वालावलची सौभाग्यवती (वालावल गाव मर्या.) मनोरंजनात्मक स्पर्धेचे आयोजन श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर, वालावल येथे करण्यात आले होते.

हा कार्यक्रम स्पर्धात्मक आणि मनोरंजनात्मक अशा दोन्ही प्रकारात पार पडला. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा ३० महिलांना प्राधान्य देण्यात आले होते. परंतु उत्साही महिलांचा सहभाग पाहता अजून वीस महिलांचे विविध फनी गेम्स घेतले गेले त्यामुळे एकूण ५० स्पर्धकांमध्ये ही स्पर्धा पार पडली.
काही वयस्कर महिलांनी सुद्धा या स्पर्धेत खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. गावातील महिला प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेचा मनसोक्त आनंद घेतला.
स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका वालावलकर मॅडम त्याचप्रमाणे स्काय न्यूज टुडे डिजिटल न्यूज चॅनेल च्या न्यूज रिपोर्टर मिस मिली मिश्रा तसेच न्यूज रिपोर्टर आदित्य बटवले व गावातील ज्येष्ठ महिला उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. जमलेल्या सर्व महिलांसाठी स्पर्धेपूर्वी एक विशेष मनोरंजनात्मक फेरी घेण्यात आली, त्यानंतर स्पर्धेतील महिलांसाठी आत्मविश्वास आणि खेळाडू वृत्ती निर्माण करण्यासाठी एक विशेष फेरी मायक्रो लॅब, आईस ब्रेकिंग एक्सरसाइज घेण्यात आली, नंतर आयोजित स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. ही स्पर्धा एकूण पाच फेऱ्यांमध्ये संपन्न झाली व स्पर्धेअंती सर्व महिलांसाठी संगीत खुर्ची हा खेळ घेण्यात आला. या स्पर्धेत सर्व फेऱ्या पार करून "वालावलची सौभाग्यवती" हा मान सौ. ममता लक्ष्मण देसाई यांनी पटकाविला तर तळ्यात- मळ्यात या स्पर्धेची विजेती सौ समीक्षा संदीप राऊत ठरल्या. त्याचप्रमाणे मायक्रो लॅब आईस ब्रेकिंग एक्सरसाइज यात सौ संजना सचिन वालावलकर विजेत्या ठरल्या. संगीत खुर्ची या स्पर्धेत सौ मानसी मंगेश कोचरेकर विजेत्या ठरल्या. प्रत्येक फेरीत विजेती महिलेला आकर्षक भेटवस्तू व फुलझाड देण्यात आले. वालावल सौभाग्यवती मानकरी ठरलेल्या महिलेला मानाची पैठणी आणि वालावल गावचे आराध्य दैवत श्री देव लक्ष्मीनारायण महाराजांची प्रतिमा देण्यात आली. गावातील सर्व सहभागी महिलांना फुलझाडे भेटवस्तू म्हणून देण्यात आली. वालावल देवस्थान कमिटी सदस्य गुरु देसाई, हॉटेल व्यावसायिक गुरुनाथ मटकर, ग्रुप सदस्य श्री. शरद राऊळ, सौ ज्योती पाटकर, सौ. मंगल वालावलकर तसेच वालावल गावचे ग्रामस्थ सुमुख वालावलकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. युवा संघर्ष मित्र मंडळ, वालावलचे स्पर्धाप्रमुख सागर पाटकर, ग्रुप अध्यक्ष ॲड. करूणाकर राऊळ, सूत्रसंचालक प्रणिता वालावलकर, भाग्यश्री राऊळ, विजय वालावलकर, वैष्णवी चव्हाण, पूजा राऊळ, संदेश राऊळ विशाल राऊळ, राहुल पालकर, हेमंत वालावलकर, गोविंद पेडणेकर आदी सदस्य उपस्थित होते. छायाचित्रण अनंत नेरकर यांनी केले.
यापुढे देखील अशाच प्रकारचे नवनवीन उपक्रम आमच्या मार्फत घेऊ असे "युवा संघर्ष मित्र मंडळ, वालावल" चा सदस्यांनी सांगितले.

ruchira top