Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

जयगड येथे एल.ई.डी. लाईट नौकेवर कारवाई

जयगड येथे एल.ई.डी. लाईट नौकेवर कारवाई

3 ते 4 लाखांची सामग्री जप्त

रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या स्पष्ट निर्देशानंतर मत्स्य व्यवसाय खाते अधिक आक्रमक झाले असून अनधिकृत मासेमारीवर कारवाई केली जात आहे. शुक्रवारी रात्री जयगड येथे एल.ई. डी. नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. यामधे ३ तांडेल होते. तसेच अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.

दि. 7/03/2025 रोजी रात्री सुमारास जयगड समोर 17°20.10.5N 72°59.02.4E मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्रीम. स्मितल कांबळे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, जयगड) व श्री. स्वप्निल चव्हाण, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर) हे नियमित गस्त घालत होते. यावेळी राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली मोहम्मद हनिफ हसनमिया तांडेल, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी यांची नौका अल-हज-हसन- नों. क्र. IND-MH-4-MM-5701 द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात जयगड समोर अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करत असताना पकडले. या नौकेवर नौका तांडेलसह 3 खलाशी होते.
सदर नौका जप्त करून जयगड बंदरात ठेवण्यात आली आहे आणि त्यावर मासळीचा आढळून आलेली नाही. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून ठेवण्यात आली आहेत. अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.
अंमलबजावणी अधिकारी श्रीम. स्मितल कांबळे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, जयगड) व श्री. स्वप्निल चव्हाण, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर) व सागरी सुरक्षा पर्यवेक्षक जयगड श्री. सुजन पवार, व सागरी सुरक्षा पर्यवेक्षक गुहागर विनायक शिंदे आणि सागरी सुरक्षा रक्षक यांचे सहकार्याने सदर कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांचे कोर्टात ठेवण्यात येणार आहे.

ruchira top